देव तयास मिळो न मिळो रे ...

सागर पोहत बाहू बळाने ।।
नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥

स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥

जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥

ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥

--- कवी बोबडे

Comments

  1. संतांच्या वचनाच्या तोडीची रचना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Pasaydaan Explained !!

दुंदुभी निनादल्या ...