Posts

Showing posts from November, 2024

तू दौड मत, ठेहेर जा

Image
तू दौड मत, ठेहेर जा सनसनी रफतार मे है लेकीन,  मुकम्मल सुकून है ठेहराव मे, जिंदगी का मजा तो सफर मे है,  ना है वो मजा मंझील पाने में,  फलसफा-ए-हयात ले जान, तू दौड मत, ठेहेर जा, तू दौड मत, ठेहेर जा ... मुड के देख पीछे, पैरों के निशान, कुछ अपने, कुछ अपनों के, मिट ना जाये ये अनमोल लम्हे,  समेट ले इन्हे, अपनी सूनहरी यादों मे, ना बन अपनों से अंजान, तू दौड मत, ठेहेर जा, तू दौड मत, ठेहेर जा ... कोई झुर्राई आंखे, कोई नन्हीसी मुठ्ठी,  ढुंड रही है तेरा सहारा, देखो हर घडी,  कोई धडकता दिल, कोई दोस्तोंकी मेहफिल, देख ये सारे है तुझे पुकारे, मुरझा ना जाये ये गुलशन कहीं, तरक्की की होड मे, संवार ले इन्हे ए बागबान,  तू दौड मत, ठेहेर जा, तू दौड मत, ठेहेर जा ...

दिवाळी

Image
 दिवाळी  चाहूल लागता थंडीची, अन सुट्ट्यांची ही घेऊन स्वारी, झाली नवरात्र-दसरा मग ही, आनंदाची येई दिवाळी ।। खुशबुदार ते उटणे लेपून, सुगंधित तेलाने मालिश भारी मळ हातावर अत्तर सुवासिक, अन मऊ रेशमी वस्त्र भरजरी ।। गोड बुंदी बेसन लाडू, तिखट खुसखुशीत खमंग चकली, चटकदार तो चिवडा अन जिभेवर, विरघळणारी शंकरपाळी ।। सुं सुं करीत अग्निबाण तो जाई आकाशी, अन फटाक्यांची आतषबाजी, चटचट आवाज अन धग जाणवीत मी उडवत राही शत फूलबाजी ।। प्रियजनांच्या सहवासात मन, उंच उंच मारी भरारी, नेत्र नसतील जरी मला पण, इंद्रियांची ही दिवाळी ।। (एका अंध मुलीची ही दिवाळी, तिच्या दृष्टिकोणातून !!दृष्टिकोण … हा शब्दही किती गमतीदार आहे न? तिला दृष्टी नसूनही दृष्टीकोण/ Perspective आहेच की. एक इंद्रिय निकामी असले तरी नाक, कान, जीभ आणि त्वचा ही इंद्रिये अधिक जोमाने काम करतात आणि कल्पनांच्या डोळ्यांसह तिला संपूर्ण अनुभव प्राप्त करून देतात ... बघा ती पुढे काय म्हणते ते) जरी हे सारे दिवे न दिसती, मन:चक्षूने सर्व अनुभूती  ज्ञानदीप हा सदा तेवती, मन मंदिरात प्रभा उजळती ।।

कोजागिरी

Image
 कोजागिरी तो नभीचा चंद्र सांगे, भाव माझ्या अंतरीचा, शिरशिरे रोमांचित होऊन, काठ तो गोदावरीचा || प्रियजनांच्या मैफिलीत, शिरकाव होता मज प्रियेचा, गंध द्विगुणीत होतसे मग, ओंजळीतील मोगऱ्यांचा  || पौर्णिमेचा रतिराज तो, ताज मिरवी चांदण्यांचा, वरमला पाहुन तोही, मुखचंद्र सुंदर हा धरीचा || भिडतसे तव काळजाला, आवाज आतुर या दिलाचा , होतसे जादू जराशी, अन मेळ होई लोचनांचा || विरघळती भावना अन, उच्चांक होई स्पंदनांचा, होतसे शब्दांवीण मग, प्रीतीसंगम दो मनांचा || स्तब्ध होई अवकाशगंगा, थांबतो काटा सुईचा, आरंभ होई त्या घडीला, मंत्रमुग्ध सह-जीवनाचा ||