कोजागिरी

 कोजागिरी



तो नभीचा चंद्र सांगे, भाव माझ्या अंतरीचा,

शिरशिरे रोमांचित होऊन, काठ तो गोदावरीचा ||


प्रियजनांच्या मैफिलीत, शिरकाव होता मज प्रियेचा,

गंध द्विगुणीत होतसे मग, ओंजळीतील मोगऱ्यांचा  ||


पौर्णिमेचा रतिराज तो, ताज मिरवी चांदण्यांचा,

वरमला पाहुन तोही, मुखचंद्र सुंदर हा धरीचा ||


भिडतसे तव काळजाला, आवाज आतुर या दिलाचा ,

होतसे जादू जराशी, अन मेळ होई लोचनांचा ||


विरघळती भावना अन, उच्चांक होई स्पंदनांचा,

होतसे शब्दांवीण मग, प्रीतीसंगम दो मनांचा ||


स्तब्ध होई अवकाशगंगा, थांबतो काटा सुईचा,

आरंभ होई त्या घडीला, मंत्रमुग्ध सह-जीवनाचा ||

Comments

Popular posts from this blog

Pasaydaan Explained !!

देव तयास मिळो न मिळो रे ...

दुंदुभी निनादल्या ...