तुझ्यामुळे ...

तुझ्यामुळे ... चित्र हे अपूर्ण होते, कुंचलेही शुष्क होते, जीवनाला रंग आला, संगती तुझ्यामुळे ... दिवस रात्र खिन्न होते, ऋतुही उदास होते, हर्षोल्हास झाला, हर-कही तुझ्यामुळे ... कृष्णमेघ दाटलेले, आसमंत काळोखलेले, चांदण्यांची रात्र आली, या धरी तुझ्यामुळे ... राऊळी मी शोधिले पण, देव दगडात नव्हता, ईश्वरी दृष्टांत झाला, अंतरी तुझ्यामुळे 🙏