तुझ्यामुळे ...
तुझ्यामुळे ...
चित्र हे अपूर्ण होते,
कुंचलेही शुष्क होते,
जीवनाला रंग आला,
संगती तुझ्यामुळे ...
दिवस रात्र खिन्न होते,
ऋतुही उदास होते,
हर्षोल्हास झाला,
हर-कही तुझ्यामुळे ...
कृष्णमेघ दाटलेले,
आसमंत काळोखलेले,
चांदण्यांची रात्र आली,
या धरी तुझ्यामुळे ...
राऊळी मी शोधिले पण,
देव दगडात नव्हता,
ईश्वरी दृष्टांत झाला,
अंतरी तुझ्यामुळे 🙏

Comments
Post a Comment