तू ...
तू ...
आस तू, आभास तू,
मोगऱ्याचा सुवास तू,
सर्वदा व्यापून आहे,
अंतरीचा श्वास तू ...
सुप्त तू, कधी व्यक्त तू,
कधी मृदू, कधी सक्त तू,
जीवना आकार देई,
गोरी कुंभार तू ...
रणरणत्या उन्हातही,
शीतल वटवृक्ष तू,
चातका या तृप्त करीशी,
पावसाचा थेंब तू ...
सफल तू अन सुफल तू,
चिखलातही कमल तू,
आयुष्यातील हर प्रश्नांची,
होतसे उकल तू ...
भव्य आकाश तू,
संधीप्रकाश तू,
आजन्म साथ देईन,
दृढ असा विश्वास तू ...
जीवनाचा अर्थ तू,
फक्त तू, बिनशर्त तू,
अंतरीच्या गाभाऱ्यातील,
दिव्य ते निरांजन तू 🙏
Comments
Post a Comment