देव तयास मिळो न मिळो रे ...
सागर पोहत बाहू बळाने ।। नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥ स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥ तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥ जो करी कर्म अहेतू निरंतर ॥ वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥ ओळख पटली ज्यास स्वतःची ॥ देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥ --- कवी बोबडे