Posts

Showing posts from August, 2025

डॅडी तुमच्याशिवाय ...

Image
  डॅडी तुमच्याशिवाय ... ( १ मार्च, २०२५ रोजी माझ्या वडिलांना, ज्यांना मी डॅडी म्हणतो, त्यांना देवाज्ञा झाली ... या दुःखद प्रसंगाने भावना अनावर झाल्या, त्यांना शब्दरूपाने वाट करू देण्याचा हा एक प्रयत्न  🙏🏼) त्या एका दिवशी सारं आयुष्य थांबलं,
 वाऱ्याने निखळलेली पाने जशी जमिनीत गडप होतात,
तसंच काहीसं तुमचं झालं डॅडी,
 त्या क्षणात ...  गेल्या कित्येक दिवसांचा काळोख डोळ्यांसमोर तरळला ...
 ते डॉक्टरांचे रिपोर्ट्स, त्या भयंकर चाचण्या,
तो प्रत्येक सुईचा वेदनादायक चटका,
आणि तुम्ही, रोज थोडे थोडे विरत चाललेले ... साऱ्या रात्री जागून तुमच्या श्वासांची गणती केली,
कधी थरारले, कधी मंदावले, कधी वाटलं, अजून काही दिवस असतील आपले,
कधी भीती वाटली, हीच का ती शेवटची रात्र? “जाने नही देंगे तुझे” असं म्हणत मी, श्रावणी आणि शैलेश 3 Idiots सारखे धडपडत राहिलो, पण ... तुमच्या शरीरातील पेशींसारखी आशाही लोपत गेली,
 तुम्ही तुमचं शरीर विसरून गेलात,
 आम्ही सर्वोपरी प्रयत्न करत राहिलो,
पण तो सगळा प्रवास असह्य होता, डॅडी ... तो शेवटचा दिवस आठवतो,  तुमची धडधड वाढली होती, मी नर्सेस आणि डॉक्टरांच्या मा...