Posts

Showing posts from July, 2010

वाट पाही ...

राया माझा सरदार शिवरायांच्या पदरी । गेला मोहिमी कधिचा प्रिया तुझी वाट पाही ॥ १ ॥ वेढा पन्हाळी पडला बाळ माझा अडकला । काळजाला थार नाही जिजाऊ ही वाट पाही ॥ २ ॥ जणु वणवा पेटला जीव कासावीस झाला । खग चातक कधिचा पावसाची वाट पाही ॥ ३ ॥ फिरे रानोवनी माय टिपायाला दाना-पाणी । कोटरांत चिव-चिव पिलं तुझी वाट पाही ॥ ४ ॥ आंग्ल लचके तोडीती सारा मुलुख लुटती । दीनवाणी हिंद माता स्वातंत्र्याची वाट पाही ॥ ५ ॥ किती चाललो फिरलो शिणलो परी नाही । वाट पंढरीची माझी विठामाई वाट पाही ॥ ६ ॥

भारत बंद !

केला कुणी आज बंद आहे नुसतीच ब्याद । जन मानसाच्या मनी काय तयाचा आल्हाद ॥ काढली रे कुणी आज सरकारची या कळ । बस फोडी, ट्रेन रोखी सारा सावळा गोंधळ ॥ म्हणे आम्ही कार्यकर्ते देशाची या चिंता वाहु । किती दूर गाव माझा बस बंद कसा जाऊ ॥ झाला बंद जो यशस्वी श्रेया साठी चढाओढ । जनतेच्या व्यथा लाख त्याची कुणाला त्या चाड ॥