Posts

Showing posts from April, 2010

एक डबा

आठंवतय ना .. लहनपणी, शाळेमध्ये, मधल्यासुट्टीत, तुला रोज खाऊ द्यायचो ... तोच मी तुझा डबा ॥ आई पासून चोरुन, लपुन छपुन, स्टुलवर चढुन, हळुच माझ्यातले लाडु खायचास ॥ सहलीला तुझ्यासोबत हिंडायचो फिरायचो, भूक लागली की लगेच तुझ्या समोर हजर असयचो ॥ मग तु मोठा झालास, ऑफीसला जायला लागलास, तरीही लंच टाईमला, मलाचं घेऊन जायचास ॥ आता मी जुना झालो, चिरलो मोडलो, अडगळीत पडून राहीलो, तरीही मी तुझाचं डबा ॥ मला कधी बाहेर काढशील का? माझ्यावरील धुळ झटकशील का? तुझा सखा सोबती मी ... नको समजु फक्त एक डबा ॥

मनं वेडंपिसं होई ...

    निशा दाटली गडंद ... उशा उगवतं नाही  ।     साऊरीची उशी माझी ... झोप लागतचं नाही ॥ मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ॥ १ ॥     नांगारली माय काळी ... ढगं बरसतं नाही ।     कीती खोल हीर खणु ... पाणी लागतचं नाही ॥ मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई   ॥ २ ॥      वाट पाहती उपाशी ... पिलं माझी घरट्यातं ।       कीती सांज ही दाटली ... खोपं सापडत नाही  मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ॥ ३ ॥     दर्या सैरभैर झाला ... शिड माझं होलपटी ।      चहुकडे जळ खोलं ... तीर दिसतचं नाही ॥ मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ॥ ४ ॥     कीती अरि हे कापले .. रण संपतचं नाही  ।      जीवं कानांमध्ये आला ... तोफ झडतचं नाही ॥ मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ॥ ५ ॥     सखा सोडुनिया गेला ... अर्ध्यावाटी हा संसार ।      कीती खाऊ मांडियला ... काऊ शिवतचं नाही  ॥ मनं वेड...